सावगाव परिसरात अनधिकृत ले-आऊटवर कारवाईचा बडगा : पोलीस बंदोबस्तात रस्ते-गटारी उद्ध्वस्त : बुडाकडून अनधिकृत वसाहतींवर कारवाई सुरूच
प्रतिनिधी / बेळगाव
बुडाच्या व्याप्तीमधील शेतजमिनीमध्ये निर्माण होणाऱया अनधिकृत वसाहतींवर कारवाई करण्याचे सत्र बुडाकडून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शनिवारी सावगाव येथील अनधिकृत ले-आऊटवर कारवाई करून रस्ते आणि गटारी हटविण्यात आल्या.
अनधिकृत वसाहतींना ब्रेक लावण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले होते. मात्र, अनधिकृत वसाहती निर्माण होण्याचे प्रकार थांबले नाहीत. त्यामुळे अनधिकृत ले-आऊटवरच कारवाई करण्याचे सत्र बुडाने सुरू ठेवले आहे. अनधिकृत वसाहतांमधील घरांना कर बसवून देण्याकरिता विविध कागदपत्रांची मागणी महापालिकेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे त्या कागदपत्रांची पूर्तता करणे नागरिकांना शक्मय नाही. मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास इमारतीला कर बसवून देण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनधिकृत वसाहतींना काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. ग्रामीण भागात अद्यापही अनधिकृत ले-आऊट निर्माण करून वसाहती निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे अनधिकृत ले-आऊटवर कारवाई करण्याची मोहीम बुडाने हाती घेतली आहे. शहराच्या विविध उपनगरात अनधिकृत वसाहती निर्माण होत असल्याने कारवाईचा बडगा उगारला आहे. सावगाव परिसरात अनधिकृत ले-आऊटवर कारवाई करण्याची मोहीम शनिवारी बुडा प्रशासनाने
राबविली.
यापूर्वी अनेक ठिकाणी अनधिकृत ले-आऊट हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील ले-आऊट निर्माण करण्याचे प्रकार थांबले नाहीत. त्यामुळे बुडाने शनिवारी सावगाव परिसरात अनधिकृत ले-आऊटवर कारवाई करून रस्ते आणि गटारी जेसीबीच्या साहाय्याने हटविल्या.
यावेळी बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, आयुक्त प्रीतम नसलापूरे, नगर योजनाधिकारी ए. एस. कांबळे, साहाय्यक कार्यकारी अभियंते एम. व्ही. हिरेमठ आदींसह बुडाचे अधिकारी उपस्थित होते.