वार्ताहर/ केपे
मोरपिर्लाचे माजी सरपंच व केपे भाजप मंडळाचे सरचिटणीस खुशाली कुष्ट वेळीप यांची गोवा अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड झाली आहे. आदिवासी कल्याण खात्यातर्फे ते जाहीर करण्यात आले आहे. वेळीप हे केपे क्षेत्राकरिता व आदिवासी समाजाकरिता गेली अनेक वर्षे कार्यरत असून ते मोरपिर्ला पंचायतीचे पंधरा वर्षे सरपंच होते. सध्या ते केपे भाजप मंडळाचे सरचिटणीस आहेत. तसेच गोमंतक गौड मराठा समाजाचे सचिव आहेत. मोरपिर्ला देवस्थानाचेही ते सचिव आहेत. अशा विविध संस्थांवर ते कार्यरत आहेत.