रुग्णांच्या मदतीसाठी अपार्टमेंटमधील खोल्यांचे आपत्कालीन वैद्यकीय खोल्यांमध्ये रूपांतर
बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक ठिकाणी बेडची कमतरता भासत आहे. आता शहराच्या मोठ्या गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांसह मिनी हॉस्पिटल’ तयार करत आहेत. इतर काही संकुलांनी त्यांच्या रहिवाश्यांसाठी कोविड काळजी केंद्र उघडली आहेत.
बेंगळूरमध्ये महिन्याभरापूर्वी मणिपाल रुग्णालयांच्या सहकार्याने रंका हाइट्समधील आपत्कालीन वैद्यकीय खोल्यांमुऴे १ हजार रूग्णांना मदत झाली आहे. एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, “कोविड – १९ सकारात्मक चाचणी आलेल्या आणि सौम्य ते मध्यम लक्षणे असणाऱ्यांची काळजी देण्यासाठी अपार्टमेंट क्लबहाऊसमध्ये व्यवस्था केली जात अहे.” जागेवर अवलंबून खोलीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक बेड्स आहेत आणि त्यामध्ये ऑक्सिजन व्यवस्था, सीपीएपी मशीन आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.”
ईएमआरला मणिपाल नेटवर्कच्या रिमोट मॉनिटरिंग सिस्टमशी जोडले गेले आहे जेणेकरून सौम्य लक्षणे आढळल्यास तज्ञांनी व्हिडिओ सल्लामसलत केली जात आहे.
मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेज प्रायव्हेट लिमिटेड (एमएचईपीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक राजागोपाल म्हणाले, “ईएमआरमागील योग्य म्हणजे सुसज्ज वैद्यकीय बेड्सचा अतिरिक्त पुरवठा प्रणालीमध्ये करणे. “तातडीची वैद्यकीय मदत ही काळाची गरज आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी वैद्यकीय खोल्या उभारण्यासाठी अधिक प्रमाणात अपार्टमेंट वाल्यांना प्रोत्साहित करतो, ”असे राजगोपाल यांनी सांगितले.
रहिवाशांना दिले प्रशिक्षण
रुग्णालयाने काही रहिवाश्यांना ईएमआर व्यवस्थापित करण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. व्हिडीओ चॅटद्वारे डॉक्टरांच्या सूचनेनुसार स्वयंसेवक रूग्णांना मदत करतील. राजगोपाल म्हणाले, “लक्षणावर अवलंबून, रुग्णाला ऑक्सिजन, नेब्युलिझेशन किंवा सीपीएपीची आवश्यकता असल्यास आणि रूग्ण गंभीर स्थितीत असल्यास डॉक्टर सल्ला देतील.” रुग्ण गंभीर झाल्यास लवकरात लवकर आयसीयूसारख्या सुविधांसह रुग्णवाहिका दाखल करण्यात येतील. तसेच स्वयंसेवक खोलीतील सॅनिटायझेशन प्रोटोकॉलची देखील काळजी घेतील.
ईएमआर स्थापित करण्यासाठी अपार्टमेंटमध्ये सुमारे ३ ते ४ लाख रुपये गुंतवावे लागतील. रूग्णांना नेहमीची व्हिडिओ सल्लामसलत फी आकारली जाईल असे हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रेस्टिज लेकसाइड आणि श्रीराम स्पंधना अपार्टमेंट्स यासारख्या अपार्टमेंटने त्यांच्या जागेवर ईएमआर स्थापित करण्यासाठी यापूर्वी सामंजस्य करार केला आहे.