हजारा समुदायाच्या 9 जणांची हत्या, अन्य अल्पसंख्य समाजही भीतीग्रस्त, देश सोडण्याचे सत्र सुरुच
काबूल / वृत्तसंस्था
तालीबानने अफगाणिस्तानचा ताबा घेण्याच्या घटनेला आता जवळपास एक आठवडा झाला आहे. तथापि, तालिबानने दिलेले शांततेचे आश्वासन पूर्ण होईल की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. अल्पसंख्याकांवरील अत्याचारांच्या घटना अद्यापही घडत आहेत. अमेरिकेचे सर्व सैनिक माघारी गेल्यानंतर तालिबान काही मोठे निर्णय घेण्याच्या विचारात आहे, असे पाश्चात्य पत्रकारांचे म्हणणे आहे. हे निर्णय कोणते असतील यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील.
अफगाणिस्तानातून आपले नागरीक बाहेर काढण्यासाठी किमान 40 देश प्रयत्नशील आहेत. अमेरिकेने आतापर्यंत आपल्या 15 हजार नागरीकांपैकी 14 हजार जणांना सुखरुप परत नेले. यग्नांपैकी 3000 जणांची सुटका गुरुवारी करण्यग्नात आली. भारताचेही अनेक नागरीक अद्याप अडकलेले आहेत.
हजारा समुदायाला धोका
तालिबानला विरोध करणाऱया हजारा समुदायाला सर्वात जास्त धोका असल्याचे दिसत आहे. या समुदायाच्या असंख्य लोकांची गेल्या दोन महिन्यांमध्ये हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी 9 लोकांना गोळय़ा घालून ठार करण्यात आले, अशी माहिती ऍम्नेस्टी या संस्थेने दिली. हे हत्याकांड गझनी या प्रांतातील मुंडारख्त या खेडय़ात झाले. मारण्यापूर्वी यांपैकी तिघांवर अनन्वित अत्याचार करण्यग्नात आले, अशी माहिती ऍम्नेस्टीने दिली. या हत्याकांडामुळे अन्य अल्पसंख्य समुदायांमध्येही भीतीचे वातावरण आहे. तालिबान शांततेच्या मार्गाने राज्य चालवेल का, हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.
आंदोलने सुरुच
तालिबानविरोधात या देशाच्या अनेक भागांमध्ये आंदोलने सुरू असून काही भागांमध्ये त्यांचा जोर वाढताना दिसत आहे. या आंदोलनांमध्ये महिलांचा सहभाग वाढत्या प्रमाणात आहे. आंदोलने शांततेच्या मार्गाने सुरु असून लोक अफगाणिस्तानचा अधिकृत ध्वज हाती धरुन रस्त्यावर उतरत आहेत.
अमेरिकेच्या सहाय्यकांचा शोध सुरु
सत्तेवर आल्यानंतर कोणावरही सूडबुद्धीने कारवाई करणार नाही, असे आश्वासन तालिबानने दोन दिवसांपूर्वी दिले आहे. तथापि, पाश्चिमात्य पत्रकारांच्या म्हणण्यानुसार तालिबानचे नेते अमेरिकेला साहाय्य करणाऱयांचा शोध घेत आहेत. काही लोकांना अटक करण्यात आली असून त्यांचे पुढे काय केले जाणार यावर चिंता व्यक्त होत आहे. अमेरिकेला साहाय्य करणाऱया प्रमुख नागरीकांची संख्या किमान 10 हजार असावी असे अनुमान असून त्यांना पकडण्याचा आदेश तालिबान नेत्यांनी गुप्तपणे दिला असल्याचे बोलले जात आहे.
दूतावासांची तपासणी
अनेक युरोपियन देशांनी तालिबानच्या विविध शहरांमध्ये स्थापन केलेले दूतावास सोडले असून तालिबानचे स्थानिक नेते या दूतावासांच्या इमारती व परिसर यांचा शोध घेत आहेत. या इमारतींमध्ये संपत्ती आणि शस्त्रे दडविलेली असावीत असा त्यांचा संशय असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.
10 अब्ज डॉलर्सचे काय झाले ?
बँक ऑफ अफगाणिस्तान ही या देशातील मध्यवर्ती बँक आहे. या बँकेकडे 10 अब्ज डॉलर्सची संपत्ती असावी असे अनुमान होते. तालिबानचा प्रयत्न ही संपत्ती ताब्यात घेण्याचा होता. तथापि, अमेरिकेने या बँकेकडील रोख रक्कम गोठविलेली असल्याने ती तालिबानी नेत्यांच्या हाती सापडणे दुरापास्त आहे. अन्य संपत्तीचा शोध घेतला जात आहे. मात्र, ती आधीच देशाबाहेर नेण्यात आली असावी, असे बोलले जाते. ही संपत्ती तालिबानच्या हाती न लागल्यास देश चालविण्याचा खर्च करणे या संघटनेला शक्य होणार काही, असेही तज्ञांचे मत आहे.
अद्याप स्थिरता नाही…
ड तालिबानने ताबा घेऊन सहा दिवस उलटल्यानंतरही स्थैर्य नाही
ड सूडबुद्धीने वागणार नाही, हे आश्वासन पूर्ण होण्यग्नासंबंधी संशय
ड विविध देशांची त्यांच्या नागरीकांना बाहेर काढण्यासाठी कसरत
ड भारतीयांना तेथून मायदेशी आणण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा