वृत्तसंस्था/ अबु धाबी
पाचव्या अबु धाबी टी-10 क्रिकेट स्पर्धेला शुक्रवार 19 नोव्हेंबरपासून येथे प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत विद्यमान विजेता नॉर्दन वॉरियर्स आणि दिल्ली बुल्स यांच्यातील सलामीचा सामना शुक्रवारी रात्री खेळविला जाणार आहे.
संयुक्त अरब अमिरातने आयपीएल तसेच आयसीसी टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषविले. या स्पर्धांना शौकिनांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. आता टी-10 स्पर्धेतील सामन्यांना उपस्थित राहणाऱया क्रिकेट शौकिनांना सामना सुरू होण्यापूर्वी 96 तासांच्या कालावधीत पीसीआर निगेटिव्ह अहवालाची सक्ती असेल.
अबु धाबी टी-10 क्रिकेट स्पर्धेचे चेअरमन आणि मालक शाजी उल मुल्क यांनी ही स्पर्धा चुरशीची होईल तसेच शौकिनांचा चांगला प्रतिसाद लाभेल, अशी आशा व्यक्त केली आहे. ही स्पर्धा दोन आठवडे चालणार असून या स्पर्धेचा दर्जा सुधारत असून प्रत्येक वर्षी ही स्पर्धा अधिक मोठय़ा प्रमाणात यशस्वी होत असल्याचे अबु धाबी क्रिकेटचे सीईओ मॅट बाऊचर यांनी सांगितले.
अबु धाबीच्या जायेद क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी 19 नोव्हेंबर रोजी स्थानिक प्रमाणवेळेनुसार नॉर्दन वॉरियर्स आणि दिल्ली बुल्स यांच्यातील सलामीच्या सामन्याला सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होईल. विद्यमान विजेता नॉर्दन वॉरियर्स संघात इंग्लंडच्या मोईन अली आणि ख्रिस जॉर्डन यांचा समावेश आहे. नॉर्दन वॉरियर्सने ही स्पर्धा आतापर्यंत दोनवेळा जिंकली आहे. दिल्ली बुल्स संघात विंडीजचा ड्वेन ब्रॅव्हो आणि इंग्लंडचा मॉर्गन यांचा समावेश आहे. 19 नोव्हेंबरला दुसरा सामना अबु धाबी आणि बांगला टायगर्स यांच्यात रात्री 8 वाजता सुरू होईल. अबु धाबी संघामध्ये विंडीजचा गेल तसेच इंग्लंडचा लिव्हिंगस्टोन यांचा समावेश आहे. बांगला टायगर्स संघात पाकच अष्टपैलू शाहीद आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डय़ू प्लेसिस यांचा सहभाग आहे. सदर स्पर्धेमध्ये 15 दिवसांचा कालावधी एकूण 35 सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक संघ दुसऱया संघाबराब्sार दोनवेळा लढत देईल. त्यानंतर आघाडीचे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, 3 डिसेंबरला उपांत्य सामन्यांना पारंभ होईल. 4 डिसेंबरला तिसऱया आणि चौथ्या स्थानासाठी सामना खेळविला जाईल. हा सामना सायंकाळी 6 वाजता सुरू होणार असून अंतिम सामन्याला 4 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता प्रारंभ होईल.