ऑनलाईन टीम / मुंबई :
टीव्ही मालिका तसेच अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका निभावणारे अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते. अनुपम श्याम मुंबईतील लाइफलाइन मेडिकेअर रुग्णालयात भर्ती होते. अनुपम श्याम यांचे मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झाले आहे.
अभिनेते यशपाल शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अनुपम श्याम यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले आहे. मागील 4 दिवसांपासून ते रुग्णालयात भर्ती होते. अनुपम श्याम यांचे मल्टीपल ऑर्गन फेल्युअर झाले होते. या सोबतच शुगर पण खूप अधिक होती.
अभिनेता अनुपम श्याम यांनी अनेक टीव्ही आणि चित्रपटात काम केली आहेत. त्यांच्या अनेक भूमिका देखील गाजल्या आहेत. मन की आवाज प्रतिज्ञामधील ठाकुर सज्जन सिंह ही भूमिका चांगली गाजली. प्रतिज्ञा 2 मध्ये पण ते काम करत होते.
अनुपम यांनी दस्तक, हजार चौरासी की मां, दुश्मन, सत्या, दिल से, जख्म, संघर्ष, लगान, नायक, शक्ति, पाप, जिज्ञासा, राज, वेलडन, अब्बा, वॉन्टेड, कजरारे और मुन्ना माइकल सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनुपम यांच्या निधनानंतर सोशल नेटवर्किंगबरोबरच मनोरंजन क्षेत्रामध्येही शोक व्यक्त केला जात आहे.