100 डेज इन हेवन शोचे सूत्रसंचालन करणार
उत्तराखंडमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार आता महानायक अमिताभ बच्चन यांचे सहकार्य घेणार आहे. अमिताभ बच्चन लवकरच एका रियलिटी शोचे सूत्रसंचालन करणार असून यात उत्तराखंडचे नैसर्गिंक सौंदर्य, साहसी पर्यटन आणि संस्कृतीला चित्रित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे 70 टक्के चित्रिकरण उत्तराखंडमध्येच होणार आहे.
‘100 डेज इन हेवन’ नावाचा हा कार्यक्रम वृत्त तसेच मनोरंजनात्मक वाहिन्यांवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन यांचा सदाबहार आवाज लाभणार आहे. बच्चन यांनी यापूर्वी गुजरातच्या पर्यटनाचा टीव्हीवर प्रचार केला होता. या प्रचार मोहिमेतील ‘कुछ दिन तो गुजारिए गुजरात में’ ही टॅगलाईन प्रचंड लोकप्रिय झाली होती.