प्रतिनिधी / मुंबई
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन अवयवदान करणार आहेत. यासंबंधीची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. ट्विटरवर त्यांनी एक फोटोही शेअर केला असून यामध्ये त्यांनी हिरव्या रंगाची रिबिन लावली आहे.
अमिताभ यांनी ट्विटरवरून या निर्णयाची माहिती देताच अनेक गरजूंनी आपले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून मदतीची अपेक्षा केली आहे. अमिताभ यांनी नेहमीच सामाजिक उपक्रमांसाठी आपला हातभार लावला आहे. पण अवयवदानाचा निर्णय घेतल्याने सध्या ते चर्चेत आहेत. या निर्णयाबाबत नेटकऱयांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याचे कौतुक केले तर काहींनी तुम्हाला अवयवदान करता येणार नाही असे म्हटले आहे. एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले की, सर तुम्हाला हेपाटायटीस-बी होता. त्यामुळे तुमचे अवयव अन्य कुणालाही दान करता येणार नाही. तसेच तुम्ही यकृत प्रत्यारोपण केले असून सध्या त्यावर औषधोपचारही सुरु आहेत. तुम्ही अवयवदानाबद्दल समर्थता दर्शवली याबद्दल तुमचे कौतुक आहेच. पण तुम्ही दाता होऊ शकत नाही.