ऑनलाइन टीम / भोपाळ :
मित्राला वैद्यकीय विद्यापिठाच्या कुलगुरुपदी बसवण्यसाठी एअरफोर्समधील एका विंग कमांडरने अवैधरित्या गृहमंत्री अमित शाहंच्या नावाने राज्यपालांना शिफारशीसाठी फोन केला. विंग कमांडर कुलदीप वाघेलाला आपला मित्र डॉ चंदेश कुमार शुक्लाला विद्यापिठाचा कुलगुरू बनवायचे होते. यासाठी वाघेलाने राज्यपाल लालजी टंडन यांना गृहमंत्री अमित शाहंच्या नावाने फोन केला.
राजभवन कार्यालयात फोन करुन ‘हॅलो, मी अमित शाह बोलतोय’, असं सांगत वशीला लावण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांना संशय आल्याने त्यांनी एसटीएफमध्ये तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरुन एसटीएफने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान, विंग कमांडर कुलदीप वाघेला नवी दिल्लीतील हवाई दलाच्या मुख्यालयात कार्यरत आहे. त्याचा मित्र चंदेशकुमार शुक्ला हा ऑर्थोपेडिस्ट असून भोपाळच्या साकेत नगर येथे त्याचा दातांचा दवाखाना होता.