नवी दिल्ली
दुध उद्योगात आघाडीवरची कंपनी अमुलने आपले नवे सोडायुक्त पेय ट्रु सेल्झर नावाने लाँच केले आहे. हे पेय लेमन (लिंबू) आणि ऑरेंज (संत्री) या स्वादात सादर करण्यात आले असून पिण्यास पौष्टीक आणि स्वादीष्ट असल्याचा दावा अमुलने केला आहे. जागतिक स्तरावर सेल्झर ज्यूस आणखी इतर स्वादांमध्ये बनवलं जातं. हे पेय आधीपासून पश्चिमी देशांमध्ये सर्वात वेगाने खपते आहे. नव्याने तयार करण्यात येणाऱया पेयात अमुल ताज्या फळांचा वापर करत आहे. त्यामुळे त्याची गुणवत्ता अधिकच वाढली आहे.