जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय : सीपीएड् मैदानावर ध्वजारोहण कार्यक्रम होणार
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वतयारीची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अधिकारी व संघटनांना सूचना केली.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक घेण्यात आली. यावषी देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे मोठय़ा उत्साहाने साजरा करणे गरजेचे होते. पण कोरोनाचे सावट अजूनही आहे. त्यामुळे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत ठरविण्यात आले.
सीपीएड् मैदानावर कोरोनाचे नियम पाळत निमंत्रित पाहुणे व प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱयांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्याचे ठरविण्यात आले. फळांचे वितरण तसेच इतर उपक्रम कोरोनाचे नियम पाळत करावेत. दरवषी त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात होते. मात्र यावषी कोरोनाचे काटेकोर नियम पाळत नेहरुनगर येथील माहेश्वरी अंधशाळेमध्ये सायं. 5 वा. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले. बैठकीला अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, बुडा आयुक्त दिनेश कुमार आदी उपस्थित होते.
प्लास्टीक ध्वजावर बंदीबाबत चर्चा
प्लास्टीक ध्वजावर बंदी घालण्याबाबत चर्चा करण्यात आली. शालेय मुलांमुलींसाठी निबंध आणि गायन स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. ध्वजाचा अवमान होवू नये यासाठी प्रत्येकाला सूचना करावी आणि स्वातंत्र्यदिन यशस्वीपणे पार पाडण्याबाबत साऱयांनीच गांभीर्याने घ्यावे, असे सांगण्यात आले.