अमेरिकेत कोरोनाचे संक्रमण अत्यंत वेगाने वाढत आहे. दिवसभरात तेथे जागतिक उच्चांक झाला आहे. एका दिवसात 1 लाख 36 हजार नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. मागील 10 दिवसांमध्ये अमेरिकेत 10 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. याचदरम्यान न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्रू कूमो यांनी प्रांतात नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. या उपाययोजनांशिवाय आम्ही संक्रमण कमी करू शकत नाही. प्रांतात खासगी पाटर्य़ांचे आयोजन करता येणार नाही असे कूमो यांनी म्हटले आहे. व्यवसायासंबंधीही नवे दिशानिर्देश दिले जाणार आहेत. न्यूयॉर्कमध्येच दिवसभरात 1,628 नवे रुग्ण सापडले आहेत.
Previous Articleमहिला अन् वृद्धांमध्ये तुलनेत अधिक अँटीबॉडीज
Next Article इटलीत दिलासा नाही
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.