अमेरिकेचे नौदलप्रमुख मायकल एम. गिल्डे आणि भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्या डिनर पार्टीत हिंदी गाण्यांचा बोलबाला राहिला आहे. विशेष बाब म्हणजे कुठल्या म्युझिक सिस्टीमवर नव्हे तर अमेरिकेच्या नौदल अधिकाऱयाने हे गाणं म्हटलं आहे. बॉलिवूडपट स्वदेशमधील ‘ये जो देश है तेरा, स्वदेश है मेरा’ हे गाणं त्या अधिकाऱयाने गात सर्वांकडून कौतुकाची थाप मिळविली आहहे.
या घटनेची चित्रफित तरनजीत यांनी सोशल मीडियावर प्रसारित करत ‘ये वो बंधन है, जो कधी टूट नहीं सकता’ अशी टिप्पणी केली आहे. 2004 मध्ये प्रदर्शित स्वदेश चित्रपटातील या गाण्याला ऑस्कर विजेता संगीत दिग्दर्शक आणि गायक ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले होते.
चित्रफितीत युएस नेव्ही बँडचे सदस्य स्वतःच्या गणवेशात उभे राहून हिंदी गाणी गाताना दिसून येतात. बँडचे काही सदस्य सांगितिक वाद्यांवर बोटं फिरवताना दिसून आले. सुमारे दीड मिनिटांच्या या चित्रफितीला सोशल मीडियावर 15 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केले आहे. तसेच ही चित्रफित आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे.
बँडकडून होळीच्या शुभेच्छा
युएस नेव्ही बँडने भारताला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि अमेरिका मिळून हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्वातंत्र्य प्रस्थापित करतील. या क्षेत्रात कायद्यानुसार कार्य करण्यासाठी दोन्ही देश प्रतिबद्ध असल्याचे उद्गार चीफ ऑफ नेव्हर ऑपरेशन ऍडमिरल गिल्डे यांनी काढले आहेत.