ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, दररोज सव्वा लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 5 लाख 68 हजार 714 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 45 हजार 943 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत मंगळवारी 1 लाख 35 हजार 653 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 1346 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 कोटी 05 लाख बधितांपैकी 66 लाख 02 लाख 517 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 37 लाख 20 हजार 254 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 19 हजार 374 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 16 कोटी 06 लाख 023 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 10 लाख 42 हजार 439 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 19 हजार 453 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 9 लाख 91 हजार 810 जणांना बाधा झाली असून, 18 हजार 070 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 73 हजार 248 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 876 जणांचा मृत्यू झाला आहे.