ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
इटली आणि स्पेननंतर अमेरिकेत कोरोनाची तीव्रता वाढली आहे. मागील 24 तासात अमेरिकेत 32 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले असून, 1321 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आतापर्यंत जगभरातील सर्वात जास्त कोरोनाचा संसर्ग अमेरिकेत झाला आहे.अमेरिकेत 2 लाख 77 हजार 161 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 7393 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या या विषाणूने जगभरातील 200 हून अधिक देशांना विळखा घातला आहे. इटली आणि स्पेनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 6507 जणांचा मृत्यू झाला आहे. आता अमेरिकेत कोरोनाची भीती वाढली आहे.