ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर पोहचली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 67 लाख 88 हजार 147 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मंगळवारी अमेरिकेत 36 हजार 447 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 1197 जणांचा मृत्यू झाला. 67.88 लाख कोरोना रूग्णांपैकी 40 लाख 68 हजार 086 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 25 लाख 19 हजार 864 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 165 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 7 लाख 68 हजार 601 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 14 हजार 615 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 7 लाख 04 हजार 813 जणांना बाधा झाली असून, 14 हजार 730 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 79 हजार 184 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 141 जणांचा मृत्यू झाला आहे.