ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 73 लाखांवर पोहचली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 73 लाख 21 हजार 465 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 09 हजार 454 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत रविवारी 33 हजार 782 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 276 जणांचा मृत्यू झाला आहे. 73.21 लाख कोरोना रूग्णांपैकी 45 लाख 60 लाख 742 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 25 लाख 51 हजार 269 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 130 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 कोटी 43 लाख 36 हजार 229 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कॅलिफोर्निया, टेक्सासमध्ये सर्वाधिक रुग्ण
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 8 लाख 10 हजार 091 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 15 हजार 607 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 7 लाख 70 हजार 230 जणांना बाधा झाली असून, 15 हजार 861 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 89 हजार 864 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 215 जणांचा मृत्यू झाला आहे.