टेक्सास
अमेरिकेमध्ये नोकऱया पुन्हा परतू लागल्या असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये बेरोजगारी दर कमी होऊन 3.8 टक्क्यांवर आला आहे. जानेवारीमध्ये तो चार टक्के इतका होता. मागच्या फेब्रुवारी महिन्यात उमेदवारांच्या भरतीत लक्षणीय वाढ झाली आहे. फेब्रुवारीत बेरोजगारी दराच्या टक्केवारीमध्ये कपात दिसली आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये 6 लाख 78 हजार नोकऱया उपलब्ध झाल्या आहेत. यावर्षी जानेवारीमध्ये 4 लाख 81000 जणांना नोकरी प्राप्त झाली आहे. याचाच अर्थ मागच्या महिन्यामध्ये नोकरी उपलब्धतेचे प्रमाण चांगले राहिले आहे. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये भरतीत चांगली प्रगती दिसली आहे. परंतु सध्याला रशिया-युपेन यांच्यातील युद्धाचा परिणाम जागतिक स्तरावर दिसत असून येणाऱया महिन्यांमध्ये रोजगाराच्या संख्येवर पुन्हा दबाव येऊ शकतो असा तज्ञांचा होरा आहे.