ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत 2 कोटी 04 लाख 45 हजार 654 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 3 लाख 54 हजार 215 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत गुरुवारी 2 लाख 28 हजार 413 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 3438 जणांचा मृत्यू झाला. 02.04 कोटी कोरोना रूग्णांपैकी 1 कोटी 21 लाख 25 हजार 806 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 79 लाख 65 हजार 633 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 29 हजार 214 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 25 कोटी 35 लाख 42 हजार 640 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कॅलिफोर्नियामध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 22 लाख 98 हजार 539 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 25 हजार 967 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 17 लाख 76 हजार 304 जणांना बाधा झाली असून, 28 हजार 227 रुग्ण दगावले आहेत.