वॉशिंग्टन
मूळचे भारतीय अमेरिकेत स्थित असलेल्या रवी चौधरी यांना अमेरिकेत जो बायडन सरकारने पेंटागॉनमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याची माहिती आहे. अमेरिकेत असणारे एरोस्पेस व सुरक्षा विशेषज्ञ रवी चौधरी यांना सरकारने वायुसेनेतील ऊर्जा, पर्यावरण विभागाच्या सहाय्यक सचिवपदी नेमणूक केली आहे. पेंटागॉनमधील महत्त्वाच्या पदावरील जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असून ते 1993 ते 2015 या काळात वायुसेनेत सक्रीयपणे सेवा बजावत आलेले आहेत. विविध जबाबदाऱया त्यांनी आपल्या कार्यकाळात यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. योग्य ती रणनिती आखण्यासोबत तिची कार्यवाही सुनियोजीतपणे करण्याची जबाबदारी या विभागावर असते. यापूर्वी चौधरी यांनी वाहतूक विभागात वरिष्ठ कार्यकारी म्हणून आपली सेवा बजावली आहे. हा अनुभव पाहूनच सरकारने त्यांना योग्य ती जबाबदारी सोपवल्याचे सांगितले जाते.