भूमिपूजन स्थळाची पाहणी : अधिकाऱयांना केल्या सूचना
अयोध्या / वृत्तसंस्था
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी होणाऱया राममंदिर भूमिपूजन सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी अयोध्येला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शनही घेतले. तसेच अयोध्येतील सोहळय़ाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
भूमिपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महनीय व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने सोहळय़ाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदिराची उभारणी होणारे स्थळ तसेच भूमिपूजनाच्या स्थळाचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱयांना काही सूचनाही केल्या.
निवडक लोकांनाच आमंत्रण
राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळय़ासाठी काही निवडक लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. त्यानुसार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येईल. तसेच राम मंदिर चळवळीशी संबंधित भाजपमधील काही वरिष्ठ नेते आणि विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील उच्चपदस्थ लोकांचा समावेश असेल. या व्यतिरिक्त अयोध्या आणि काशी येथील धार्मिक व वैदिक अभ्यासकही उपस्थित असतील.
पाच-सहा तासाचा सोहळा
भूमिपूजन विधीची पूजा करण्याची पद्धत वैदिक रीतिरिवाजांनुसार रामानंदी परंपरेनुसार केली जाणार आहे. 5 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून विधींना प्रारंभ होईल. हा धार्मिक विधी जवळपास पाच ते सहा तास चालणार असल्याचे समजते. मात्र, मुख्य विधी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीवेळीच पार पडेल. सोहळय़ासाठी सप्तपुऱयांसहच्या देशातील प्रमुख धार्मिक स्थळांची माती, पाणी आणि पर्वतांची माती मागविली जात आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखत हा सोहळा पूर्ण केला जाणार आहे.