आलिया भट आणि रणबीर कपूर कधी लग्न करणार ही चर्चा गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. नुकतेच दिवाळीत या जोडीने कालीमातेचे दर्शन घेतले. रणबीर आणि दिपिकाचे ब्रेकअप झाल्यानंतर आलिया त्याच्या आयुष्यात आली आणि अनेक ठिकाणी या कपलचे बाँडिंग दिसले. आता त्यांनी दोनाचे चार व्हावे असे त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. यंदाच्या डिसेंबरमध्ये या दोघांच्या लग्नाचा बार उडणारच असे वाटत असताना आता पुन्हा त्यांचे शुभमंगल लांबले आहे.
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण आता बातम्या येत आहेत की, हे दोघे 2021 मध्ये नव्हे तर 2022 मध्ये लग्न करणार आहेत. दोघांनाही लग्न करायचे आहे, परंतु यावर्षी तसे होणार नाही. ‘आलिया व रणबीर यांनी लग्नासाठी उत्तम योजना आखली आहे आणि त्यामुळे त्यांना घाई करायची नाही. ते त्यांच्या लग्नाची खूप दिवसांपासून योजना आखत आहेत. मात्र, हे लग्न कधी होणार याबद्दल सूत्राने दुजोरा दिलेला नाही.
आलिया भट्टने अलीकडेच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवरून रणबीर आणि आलियाचा साखरपुडा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात रणबीरचा लकी नंबर 8 ची अंगठी दिसत आहे. आलियाच्या आणखी एका मिरर सेल्फीमध्ये तिच्या हातात ही अंगठी दिसत आहे. हे दोन फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या साखरपुडय़ाची चर्चा सुरु झाली. सध्या तरी दोघांच्या हातात जे सिनेमे आहेत त्यांचे शूटिंग अपूर्ण आहे. तर ब्रम्हास्त्र या सिनेमात दोघेही प्रथमच एकत्र दिसणार आहेत.
रणबीरने एका मुलाखतीत म्हटले होते की, जर कोरोना व्हायरस नसता तर कदाचित त्याने आलियाशी आधीच लग्न केले असते. पण आता आधी लग्न हातातल्या सिनेमांचे असा पण करून त्यांनी तारीख पुढे ढकलली आहे.