वार्ताहर/ सांबरा
निलजी येथील प्रतिष्ठित नागरिक व रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटी आणि रणझुंझार शिक्षण संस्थेचे संस्थापक व सुप्रभात ट्रान्स्पोर्टचे मालक अशोकराव नारायणराव मोदगेकर यांचे शुक्रवार दि. 28 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधनसमयी ते 63 वर्षाचे होते.
त्यांना म. ए. समितीचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. श्रीराम मंदिर ट्रस्टचे ते विश्वस्त होते. गावातील प्रत्येक सामाजिक व धार्मिक कार्यात ते धडाडीने भाग घेत असत. त्यांचे सहकार व शिक्षण क्षेत्रातील कार्य मोठे आहे. त्यांच्या जाण्याने गावची मोठी हानी झाली आहे. शनिवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील व बेळगाव परिसरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, चार बहिणी व भाऊ असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. 31 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे.