चेन्नई
व्यावसायिक वाहन निर्माती कंपनी अशोक लेलँडने आपल्या नव्या एव्हीटीआर या ट्रकचे नुकतेच बाजारात दाखल केले. बीएस 6 शेणीतील नवा ट्रक आधुनिकतेने युक्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे. व्यावसायिक वाहनांच्या क्रमवारीत पहिल्या दहात राहण्याचा आमचा मानस असून त्यादृष्टीने उत्तम क्षमतेचे वाहन तयार करण्याचे ध्येय यापुढेही सुरूच राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. वाहनाची निर्मितीच आधुनिकतेची कास धरून केलेली असल्याने भारतासह इतर देशातही या वाहनाला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.