कंसीलर योग्य पद्धतीने लावल्यास त्वचा छान तजेलदार दिसू लागते. कंसीलरमुळे चेहर्यावरचे काळपट डाग, चट्टे, लपवता येतात. मात्र यासाठी कंसीलरचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा. कंसीलरच्या वापरासंबंधीच्या या काही टिप्स…
- त्वचेच्या रंगानुसार कंसीलरची निवड करणं खूप आवश्यक आहे. त्वचेच्या रंगाशी मिळताजुळता कंसीलर डाग, काळी वर्तुळं, मुरूमांना अगदी नीट झाकू शकेल. योग्य निवडीसाठी कंसीलरचा रंग नैसर्गिक प्रकाशात तपासून बघा.
- कंसीलर लावण्याची पद्धत सर्वात महत्त्वाची असते हे लक्षात घ्या. बोटांवर थोडा कंसीलर घेऊन हलक्या हातांनी डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर लावा.
- कंसीलर लावल्यानंतर काही वेळ दुसरं कोणतंही क्रीम लावू नका. दुसरं क्रीम चोपडल्यास कंसीलर नीट सेट होणार नाही.
- छोटय़ा डोळ्याच्या महिलांनी फाउंडेशनपेक्षा एक शेड फिक्कट असणार्या कंसीलरची निवड करायला हवी.
- थंडीत त्वचा कोरडी पडत असेल तर कंसीलरआधी चेहर्याला कोल्ड क्रीम लावा.
- चेहर्यावर बरेच डाग असतील तर भरपूर कंसीलर चोपडू नका. कंसीलरचे पातळ थर लावा.
- तेलकट त्वचा असल्यास क्रीम बेस्ड किंवा स्टीक्ड कंसीलर लावू नका. लिक्विड कंसीलर वापरा.
- चेहर्यावरील मुरूमं, पुटकुळ्या लपवण्यासाठी पेन्सिल कंसिलर वापरा.