असुस सीएक्स 1101 ची एंट्री
वृत्तसंस्था/ बेंगळूर
असुस कंपनीने भारतीय बाजारामध्ये आपला नवा क्रोमबुक (लॅपटॉप) सीएक्स 1101 नुकताच लॉन्च केला आहे. या लॅपटॉपला 11.6 इंच अँटीग्लेयर एचडी डिस्प्ले असणार असून याच्या रग्ड डिझाइनला एमआयएल-एसटीडी 810 एच हे प्रमाणपत्रही मिळाले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
या लॅपटॉपमध्ये डय़ुअल कोअर इंटेल सेलेरॉन एन 4020 प्रोसेसर असणार असून 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेजची व्यवस्थाही यामध्ये असणार आहे. सुरुवातीची किंमत 19,999 रुपये इतकी असणार असून 15 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर या लॅपटॉपची विक्री सुरू होणार आहे. 15 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत खरेदी करणाऱया ग्राहकांना हजार रुपयापर्यंतची सवलत यावर मिळणार आहे. म्हणजेच सवलतीत लॅपटॉप 18 हजार 990 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे.
इतरही वैशिष्टय़े पाहुया
डिस्प्ले- 11.6 इंच अँटीग्लेयर एचडी डिस्प्ले
प्रोसेसर- डय़ुअल कोअर इंटेल सेलेरॉन एन 4020 प्रोसेसर
स्टोरेज- 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज
बॅकअप- सिंगल चार्जवर बॅटरी 13 तासाचा बॅकअप
कनेक्टिव्हीटीसाठी- 2 युएसबी 3.2 टाइप सी पोर्टस्, 2 युएसबी 3.2 टाइप ए पोर्टस्, मायक्रो एसडी कार्ड रिडर, 3.5 ऑडियो जॅक
वजन-1.24 किलोग्रॅम