प्रतिनिधी /पणजी
बार्देश तालुक्यातील अस्नोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रोशनाली कवळेकर यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच शंकर नाईक यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
अस्नोडा पंचायतीचा थिवी मतदारसंघात समावेश असला तरीही ही पंचायत माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या ताब्यात आहे. विद्यमान सरपंच कवळेकर या कांदोळकर यांच्या समर्थक मानल्या जातात. नव्या सरपंचाची निवड करण्यासाठी मंडळाची विशेष बैठक पंचायतीच्या सभागृहात बोलावण्यात आली होती. त्यावेळी नऊ पैकी पाच पंचसदस्य उपस्थित होते. गटविकास कार्यालयातील विस्तार अधिकारी मनोहर परवार यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. कांदोळकर या विद्यमान मंडळातील चौथ्या सरपंच ठरल्या आहेत.