केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोही सहभागी होणार
प्रतिनिधी / पणजी
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप रविवार दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी येथे होणार असून त्यावेळी नामवंत अभिनेत्री झिनत अमान, केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रिये यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी वरील माहिती देऊन सांगितले की, आता चालू असलेल्या या महोत्सवात गर्दी नाही परंतु चांगले, दर्जेदार दर्दी प्रतिनिधी आहेत. कोणताही गाजावाजा नाही परंतु नियोजनबद्ध रितीने महोत्सव चालू आहे. कोरोना नियम, अटी पाळून महोत्सवाचे कामकाज सुरु असून एक आसन सोडून दुसऱया आसनावर दर्शक बसतात. त्यामुळे दाखवण्यात येणारे बहुतेक चित्रपट दर्दी सिने रसिकांनी चांगल्या प्रतिसादाने भरलेले असतात, असा दावा त्यांनी केला.
आदल्या दिवशी म्हणजे 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्यावरील चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. यंदा प्रतिनिधींची संख्या मर्यादित असून महोत्सवाच्या ठिकाणांच्या बाहेर कोणताही गाजावाजा नसल्याचे ते म्हणाले.
पुढील 52 वा महोत्सव याच चालू वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये होणार आहे.