वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिंदू दत्तक ग्रहण आणि भरण-पोषण अधिनियमाच्या (एचएएमए) आंतर-देशीय दत्तक घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम सादर केले आहेत. दत्तक ग्रहण (दुरुस्ती) विनियम 2021 नुसार अधिनियमाच्या अंतर्गत दत्तक घेणारे कुटुंब अपत्याला विदेशात नेण्यासाठी केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरणाकडून (सीएआरए) एनओसी (ना हरकत दाखला) प्राप्त करू शकते.
आतापर्यंत केवळ एक न्यायालयच एनओसी प्रदान करत होते. तर आतापर्यंत एचएएमएच्या अंतर्गत आंतर-देशीय दत्तक घेण्याच्या संबंधी सीएआरएसाठी कुठलेच नियम नव्हते. अधिनियम मुलांना दत्तक घेण्याच्या नियमांशी संबंधित आहे, कारण हा दत्तक घेण्यात आलेल्या मुलामुलींना अपत्याचे सर्व अधिकार प्रदान करतो.
सीएआरए हेग-अनुमोदित देशांसाठी ना हरकत प्रमाणपत्र जारी करणार असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने म्हटले आहे. मुलांच्या संरक्षण आणि सहकार्यावर हेग कन्व्हेंशन एक आंतरराष्ट्रीय करार असून त्यावर भारताकडून आंतर-देशीय दत्तकग्रहणाच्या संबंधी स्वाक्षरी करण्यात आली आहे.
संबंधित क्षेत्रातील जिल्हा न्यायदंडाधिकाऱयांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर सीएआरए एनओसी प्रदान करणार आहे. दत्तक घेतलेल्या मुलामुलींना अन्य देशात स्थलांतरित करण्यासंबंधी अनेक आव्हाने असल्याचे नवे नियम आणले गेल्याचे एका अधिकाऱयाने म्हटले आहे.