शहर परिसरात विविध संस्था-मंडळांतर्फे महिला दिन साजरा करण्यात येणार
प्रतिनिधी / बेळगाव
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शहर परिसरात विविध संस्था आणि मंडळांतर्फे महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. स्पर्धा, व्याख्यान, सत्कार, मुलाखती, फोटो स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम यावेळी होणार आहेत.
आविष्कार महिला उद्यमशील संस्था
आविष्कार महिला उद्यमशील संस्थेतर्फे मंगळवार दि. 9 मार्च रोजी दुपारी 3.45 वाजता वरेरकर नाटय़संघाच्या सभागृहात कार्यक्रम होणार आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून पंख हॅन्डीक्राफ्ट्स संस्थेच्या संचालिका गौरी मांजरेकर उपस्थित राहणार आहेत.
केअर हेल्थ फौंडेशन-मेटगुड हॉस्पिटल
केअर हेल्थ फौंडेशन व मेटगुड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 रोजी वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरण हा या वेबिनारचा विषय असून दुपारी 4.30 ते 5.30 यावेळेत हे वेबिनार होईल. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. कीर्ती शिवकुमार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. सुरेखा पाटील, डॉ. सविता कद्दू, डॉ. वनिता मेटगुड, डॉ. सौभाग्य भट्ट व डॉ. सी. एन. तुगशेट्टी उपस्थित राहणार आहेत.
आदर्श महिला मंडळ
आदर्श महिला मंडळाचा वर्धापन दिन आणि महिला दिन असा संयुक्त कार्यक्रम दि. 6 रोजी सकाळी 11.30 वाजता न्यू उदय भवन येथे होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वरुपा इनामदार उपस्थित राहणार आहेत. सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षा स्मिता शंकरगौडा यांनी केले आहे.
स्वशक्ती महिला सक्षमीकरण मंच
केएलई सोसायटीच्या स्वशक्ती महिला सक्षमीकरण मंचातर्फे दि. 8 रोजी केएलई सेंटनरी कन्व्हेंशन सेंटर (डॉ. बी. एस. जिरगे हॉल) येथे सकाळी 11 वाजता महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी पद्मश्री विजेत्या माता मंजम्मा जोगती यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव डायबेटीक सेंटर-वेट मॅनेजमेंट सेंटर
बेळगाव डायबेटीक सेंटर व वेट मॅनेजमेंट सेंटर या डॉ. नीता देशपांडे यांच्या दवाखान्यातर्फे अभिनव पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने महिलांनी आपल्या घरात घर कामाला सहकार्य करणाऱया, मदत करणाऱया महिलेसमवेत फोटो काढून त्याखाली कॅप्शन लिहावयाची आहे. हे फोटो दि. 7 मार्चपर्यंत फेसबुक फेजवर पाठवून द्यावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी 9742503048 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिजाऊ महिला मंडळ
जिजाऊ महिला मंडळातर्फे दि. 9 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता कंग्राळ गल्ली येथे होणाऱया या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
जायंट्स सखी
जायंट्स सखीचा महिला दिन दि. 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता उषाताई गोगटे शाळेमध्ये साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध संस्थांच्या महिला प्रमुखांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शारदोत्सव महिला समिती
शारदोत्सव महिला समितीतर्फे शनिवार दि. 13 मार्च रोजी दुपारी 4.30 ते 6 यावेळेत ‘वेगळय़ा वाटेने जाताना’ हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. सामाजिक क्षेत्रात तसेच वेगळे काम करणाऱया महिलांची झूमद्वारे मुलाखत घेण्यात येणार आहे.
नियती फौंडेशन
नियती फौंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 10 गरजू महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार आहेत. तसेच सायंकाळी हॉटेल ईफा येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.