नवी दिल्ली
एका बाजूला चीनच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात धोरण राबविले जात असताना दुसऱया बाजूला काही चीनच्या निवडक कंपन्या मात्र आपले व्यापार देशामध्ये करत असल्याचे पहावयास मिळत आहे. आता चीनचे रोलिंग स्टॉक ऍण्ड कंपोनेंट निर्मिती समूह सीआरआरसी नॉनजिग झेन मेट्रो कोचचे उत्पादनाचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असून सदरच्या प्रकल्पाचा प्रारंभ झाल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार सदरच्या मेट्रो कोचे उत्पादनासाठीचा प्रकल्प हा आंध्र प्रदेशातील श्रीसिटीमध्ये करण्यात येणार आहे. यांच्या उभारणीसाठी जवळपास कंपनी 350 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. यासोबतच प्रकल्पाच्या बांधणीसाठी 45.3 एकर जमीन कंपनीने घेतलेली असून हा प्रकल्प चालू वर्षातील अखेरीपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत असून यातून जवळपास 500 लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा अंदाज आहे.
विविध भागतील मेट्रोचा समावेश
आंध्रमधील प्रकल्पामध्ये दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन, बेगळूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट ऍथोरिटी आणि चेन्नई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांच्यासाठीही कोच निर्मिती करणार असल्याची माहिती आहे.