मेष: आवक वाढेल, धनार्जनामुळे आर्थिक स्थितीवर शुभ परिणाम.
वृषभः वैवाहिक जोडीदाराला काही तरी उद्योग सुरु करून द्याल.
मिथुन: पैजेच्या खर्चामुळे कर्ज काढावे लागेल.
कर्क: शुभ कार्याला जाताना मागे पाहू नका, थांबल्यास अडथळे.
सिंह: बेफिकीर वृत्ती टाळणे सर्व दृष्टीने योग्य ठरेल.
कन्या: घरातील राखीव सुवर्ण विकल्याने धनसंपत्तीला ओहोटी.
तुळ: कर्ज अथवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता.
वृश्चिक: कामाचे स्वरुप न समजल्याने हातची संधी जाईल.
धनु: मनात नसतानाही अनावश्यक काम पूर्ण करावे लागेल.
मकर: जादूटोणा, करणीबाधा यांच्या मागे लागल्याने नुकसान होईल.
कुंभ: अपरिहार्य गोष्टींमुळे महत्त्वाची स्थित्यंतरे घडतील.
मीन: कुटुंबाची कर्तबगारी धनलाभ घडविण्याची शक्यता.