मेष: इतरांवर विसंबून राहिल्याने कामे वेळेत होणे अवघड.
वृषभः जी कामे हाती घ्याल ती बराच काळ रेंगाळतील.
मिथुन: मोठमोठे प्रकल्प, घर बांधणी, सार्वजनिक कामे यात यश .
कर्क: स्वतःच्या कर्तृत्वाने घराण्याचे नाव उज्ज्वल कराल.
सिंह: वैवाहिक जोडीदाराच्या पायगुणाने उत्कर्ष साधाल.
कन्या: भागीदारी व्यवसायात लाभ होईल, सावधगिरी बाळगा.
तुळ: वारसा हक्काने स्थावर इस्टेट मिळण्याची शक्यता.
वृश्चिक: वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षाभंग झाल्याने मनस्ताप होईल.
धनु: वैचारिक मतभेदामुळे कुटुंबापासून दूर राहावे लागेल.
मकर: उच्चाधिकार किंवा मोठेपणा मिळण्यास अनुकूल काळ.
कुंभ: नोकरी, व्यवसायाच्या बाबतीत मनासारखे यश मिळण्याची शक्यता.
मीन: कार्यकर्तृत्वामुळे तुमची चांगली छाप पाडाल.