प्रतिनिधी / सातारा
“तरुण भारत” ने कोरोनाचे वास्तव स्वरूप दाखवल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाला “लॉक डाऊन” करावा लागला. वास्तव काय आहे, हे किमान पातळीवर येऊन पाहिले पाहिजे. नूतन खासदार उदयनराजे भोसले यांनी “दिल्ली सुरू-सातारा का बंद?” असं काही विधान केलं म्हणून वास्तव बदलत नाही. हे वास्तव स्वीकारून जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्ह्याचा लॉक डाऊन ( सकाळी 9 ते 2 ) हा 1 ऑगस्ट पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे राजकीय स्टंट सोडून जागतिक, राष्ट्रीय, देश, जिल्हा आणि गावपातळीवर जनतेने प्रशासनासोबत उभे राहण्याची गरज आहे. दरम्यान, रविवारी रात्री आलेल्या अहवालात 106 नवे बाधीत आल्याने आकडा 3203 झाला आहे.
काय आहे नक्की स्थिती?
17 पासून लॉकडाऊन केल्यानंतर या 9 दिवसात 856 बाधित समोर आले तर 497 जणांनी कोरोनावर मात केली. तर बळींच्या संख्येने शतक ओलांडले असून लॉकडाऊनचा फायदा झाला की तोटा यामध्ये न पडता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन तसाच ठेवला आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सकाळी 9 ते 2 या वेळेत सुरु राहील. यापुढे जिल्हावासियांना सवयभानच तारु शकणार असून कडक लॉकडाऊन नसताना देखील काळजी घेत जिल्हा कोरोनामुक्त करण्याचे आवाहन प्रशासनासह नागरिकांपुढे उभे आहे.
सात तालुक्यांमध्ये बाधितांची वाढ सुरुच
लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत घट होईल असा कयास होता. मात्र याच काळात रुग्ण वाढले व कोरोनामुक्तही झाले. मात्र कोरोनामुक्तीचा वेग हा 60 टक्केच्या आसपास रेंगाळतोय. सध्यस्थितीत कराड तालुका पुन्हा हॉटस्पाटकडे वाटचाल करु लागलाय तर पाठोपाठ पाटण, सातारा, वाई, खंडाळा, फलटणसह कोरेगावात कमी अधिक प्रमाणात रुग्ण वाढ सुरुच आहे. जावलीतील पुनवडी, साताऱयातील जिहेच्या साखळय़ा तुटू लागल्या असल्या तरी सात तालुक्यांमध्ये नागरिकांना गर्दी न करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेत कोरोनाविरुध्दचा लढा जारीच ठेवावा लागणार आहे.
जिल्ह्यातील 65 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 65 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. यामध्ये जावली तालुक्यातील पुनवडी येथील वय 30, 55, 6, 28, 55, 27, 31, 11, 23 वर्षीय महिला व वय 38, 50, 39, 25, 2, 30, 27, 61, 36, 70, 29, 25 वर्षीय पुरुष, पासेवाडी-बामणोली 40 वर्षीय महिला, मेढा 13 वर्षीय बालक,
महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील वय 40, 45, 24, 39 वर्षीय महिला व 19, 33, 47, 12, 48, 25, 75 वर्षीय पुरुष, पाचगणी 23, 34 वर्षीय पुरुष,
सातारा तालुक्यातील उफळी 55, वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, 10 वर्षीय मुलगी, खावली 80, 29 वर्षीय महिला, देगाव रोड अमरलक्ष्मी 39 वर्षीय पुरुष,
वाई तालुक्यातील बदेवाडी येथील 83 वर्षीय पुरुष, शेंदूरजणे येथील 50 वर्षीय महिला व 57 वर्षीय पुरुष.,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ कोलाटे आळी 28, 18 वर्षीय पुरुष, सटवाई कॉलनी 29 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी 14 वर्षीय युवक, 30 वर्षीय महिला, शिरवळ येथील वय 70, 32, 55, 33, 9, 8, 26 वर्षीय महिला, 37, 55, 9, 8, 6, 30 वर्षीय पुरुष, *पाटण तालुक्यातील* सोनईचीवाडी 44 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रविवारी अहवालात 5 बळी
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात निगडी ता. कोरेगाव 80 वर्षीय पुरुष व कवठे ता. खंडाळा 80 वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये वडूज ता. खटाव 58 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोरोनाबाधित आला होता. तसेच खाजगी येथे वडगाव हवेली ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष व रविवार पेठ कराड येथील 52 वर्षीय पुरुष या दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी रात्रीच्या अहवालात 122 बाधित
जिह्यात काल शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 122 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. महिंद, ता. पाटण येथील 92 वर्षीय महिला व उंब्रज, ता. कराड येथील 87 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कराड तालुक्यात 27 बाधित, गंभीर स्थिती
कराड तालुका : मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड 28 वर्षीय महिला, ओंड 41 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 5 वर्षीय बालक, तारुख 33 वर्षीय पुरुष, शिवडे, उंब्रज 55 वर्षीय पुरुष, कापील 26 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर 26 वर्षीय पुरुष, मलकापूर 4 वर्षीय बालक, गोटे 38, 17 वर्षीय महिला, वाकनरोड 50 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी कराड 79 वर्षीय पुरुष, कुसुर 65 वर्षीय महिला, कराड 56 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ 64 वर्षीय पुरुष, जाखीणवाडी 32 वर्षीय पुरुष, गोटे 58, 41, 20, 24, 17, वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, मलकापूर 57 वर्षीय पुरुष, कराड 65 वर्षीय महिला, पेठ बु 75 वर्षीय पुरुष, सुपने 60 वर्षीय महिला.
सातारा शहर, तालुक्यात रुग्ण वाढले
सातारा तालुका 22 नवे बाधित : चिंचणेर येथील 58 वर्षीय महिला, वाढे फाटा येथील 44 वर्षीय महिला, अमरलक्ष्मीनगर 38 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 14 वर्षाची युवती, 52 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, कण्हेर 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ 26 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक, 5 वर्षाची बालिका, 5 वर्षाची बालिका, 30 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, माची पेठ 30 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर शाहुपूरी 24 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, सेवागिरी कॉलनी सत्यमनगर 47 वर्षीय पुरुष, मोपरे 49 वर्षीय पुरुष, वाढेफाटा येथील 44 वर्षीय महिला, मंगळवार पेठ सातारा 58 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यात 19 नवे बाधित
पाटण तालुका : नेरले येथील 47 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, अंबराग येथील 55 पुरुष, 40 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 13 वर्षीय युवती, 34 वर्षीय महिला, 8 वर्षीय बालक, 55 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, म्हावशी 42 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, 54 वर्षीय पुरुष, बीबी 20 वर्षीय महिला, पाटण 16 वर्षी युवती, निगडी येथील 35 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
वाई तालुक्यात बाधितांची वाढ सुरुच
वाई तालुका 16 बाधित : शेंदूरजणे येथील 38, 15, 14, 35, 59 महिला, 12 वर्षाची युवती, 6 वर्षाची बालिका, 14 युवक, 34, 42 वर्षीय पुरुष, वेळे 47 वर्षीय पुरुष, गोवीडीगार 65 वर्षीय महिला, सिध्दनाथवाडी 25, 58, 24 वर्षीय पुरुष, जामतळ 58 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुक्यात 16, फलटणमध्ये 8
खंडाळा तालुका : खंडाळा येथील 34, 21 वर्षीय पुरुष, तळेकरवस्ती 50 वर्षीय महिला, शिरवळ 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, विंग 46 वर्षीय महिला, शिरळ 16 वर्षीय युवती, 22 वर्षीय पुरुष, खंडाळा 48, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, धनगरवाडी 65 वर्षीय महिला, 74 वर्षीय पुरुष, सांगवी 19 वर्षीय महिला, नायगाव 7 वर्षाचा बालक, खंडाळा 1 वर्ष 2 महिन्याचे बाळ.
फलटण तालुक्यातील रविवार पेठ, फलटण तालुका : फलटण येथील 41 वर्षीय महिला, मुंजवडी 65 वर्षीय पुरुष, मलटण 3 वर्षीय बालिका, 22 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला
कोरेगाव 10, जावलीत 1, खटाव 2, कोरेगाव तालुका : वाठार येथील 29 वर्षीय पुरुष, रहिमतपूर 40 वर्षीय पुरुष, वाठार किरोली 31, 43 वर्षीय पुरुष, बनवडी 35 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 13 वर्षीय युवती, 1 वर्षीय बालक, तडवळे येथील 50 वर्षीय महिला. जावली तालुका : दूदूस्करवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 75 वर्षीय महिला. खटाव तालुका : वडूज येथील 66 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 71 वर्षीय पुरुष.
398 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा 18, उपजिल्हा रुग्णालय फलटण 41, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव 19, वाई 34, शिरवळ 73, पानमळेवाडी 71, मायणी 30, महाबळेश्वर येथे 3, खावली 109 एकूण 398 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण बाधित 3203
एकूण कोरोनामुक्त 1743
एकूण बळी 113
उपचारार्थ रुग्ण 1417
रविवारी
एकूण बाधित 106
एकूण मुक्त 65
एकूण बळी 07