जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
आझादी का अमृत महोत्सव यानिमित्त स्मार्ट सिटी लिमिटेडच्यावतीने सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार अनिल बेनके, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी उपस्थित होते.
आझादी का अमृत महोत्सवनिमित्त कायद्याविषयी जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानिमित्त ही सायकल रॅली काढण्यात आली. आकाशामध्ये फुगे सोडून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह विविध अधिकारी व सायकलपटूंनी रॅलीमध्ये भाग घेतला होता.