आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी शहरातून जाणारा दिघंची ते टोप वडगाव या हायवेचा प्रश्न सलग दुसऱ्या दिवशी चिघळला. शनिवारी पोलीस स्टेशन लगत सुरू असणारे रस्त्याचे काम युवा नेते अनिल पाटील व सहकाऱ्यांनी बंद पाडले. तर पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून कुलूप लावण्यात आले. आटपाडी पोलिसांनी हस्तक्षेप करत कोंडलेल्या पीडब्ल्यूडी अधिकारी व कर्मचारी यांची सुटका केली.