शुक्रवारी 62 नवे कोरोनाबाधित
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मागील काही दिवसात राज्यभरात कोरोना रूग्णांची झपाटय़ाने वाढ होत आह़े रत्नागिरी जिह्यातही मागील आठ दिवसांमध्ये नव्या 400 रूग्णांची भर पडली आह़े त्यामुळे ऐन शिमगोत्सवातच आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान निर्माण झाला आह़े यामुळे नागरिकांनीही काटेकोर काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
मागील शनिवारी जिह्यातील कोरोना रूग्णांची संख्या 10 हजार 210 होत़ी ही 7 दिवसांमध्येच 400 हून अधिक रूग्णांची वाढ होऊन ही संख्या शुक्रवारी 10 हजार 617 झाली आह़े या कालावधीतमृत्यूची एकच घटना समोर आली आह़े एका बाजूला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना व मृत्यूचे प्रमाणही नियंत्ररात येत असताना वौत्या रुग्णसंख्येने चिंता व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 62 रूग्ण आढळून आले असून 12 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े मागील 24 तासात जिह्यात तब्बल 1 हजार 108 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 37 तर ऍन्टीजेन चाचणीत 25 असे एकूण 62 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 17, दापोली 3, खेड 9, गुहागर 1 चिपळूण 25, संगमेश्वर 3, मंडणगड 2, लांजा 2 रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 10 हजार 617 झाली आह़े बरे झालेल्या रूग्णांची संख्या 9 हजार 911 व प्रमाण 93.35 टक्के आह़े जिह्याचा मृत्यूदर 3.49 आह़े
खेडमध्ये 2856 जणांचे लसीकरण
खेड तालुक्यातील दहा लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत 2856 जणांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तालुक्यात 25 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. खेड तालुक्यात गुरूवारी नगरपरिषद हद्दीतील 7, खोंडे 2 व आंबवलीतील एका रूग्णाची भर पडली आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 685 झाली आहे.