दोडामार्ग / प्रतिनिधी:
आडाळी एमआयडीसीला आज केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय वनौषधी संस्थेला देण्यात आलेल्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पतून शेकडो जणांना रोजगार मिळेल. येथील जैवविविधतेला जागतिक ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री. नाईक केंद्रीय आयुष मंत्री असताना त्यांनी राज्यासाठी एकमेव असलेला राष्ट्रीय वनौषधी संस्था हा प्रकल्प मंजूर केला. सुरवातीला हा प्रकल्प जळगाव व नंतर लातूर येथे हलविण्याचा प्रयत्न झाला. मात्र जिल्ह्यातील शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी समन्वय साधून अखेर जिल्ह्यात प्रकल्प आणला. गेल्या जून मध्ये राज्य शासनाने आडाळी एमआयडीसी तील पन्नास एकर जागा या प्रकल्पला दिली. महामंडळाने तातडीने या जागेचे हस्तातरण केले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री. नाईक यांचा एकनाथ नाडकर्णी, राजन म्हापसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार केला.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांसह सुधीर दळवी, प्रवीण गावकर, प्रदीप गावकर, संजय विरनोडकर, ग्रामपंचायत सदस्य पराग गांवकर, सुरेंद्र सावंत, संतोष हडीकर, ग्रामस्थ शंकर गांवकर, गोविंद परब,एम. एम.गावकर,भगवान गावकर, दत्ताराम गावकर, भिवा गांवकर, जयराम गावकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.