जिल्हय़ात आतापर्यंत 32 रुग्ण कोरोना मुक्त : मंगळवार ठरला ‘कोरोना मुक्त’ दिवस
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आणखी दहाजण ‘कोरोना मुक्त’ झाले आहेत. आतापर्यत 32 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सद्यस्थितीत 95 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. ही माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्हय़ात आतापर्यंत कोरोना बाधित दोघा रुग्णांचा मृत्यू झाला असून एकजण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे.
जिल्हय़ात सध्या कणकवली तालुक्मयात पुढीलप्रमाणे कंटेनमेंट झोन आहेत. धालवली धनगरवाडी, घोणसरी पिंपळवाडी, हळवल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळवल नं. 1, कलमठ जि. प. प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी, तळेरे, नाटळ, कुरंगवणे, नवीन कुर्ली वसाहत, जानवली गावातील घरटणवाडी प्राथमिक शाळा, शेर्पे बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, वारगाव येथील धुमकवाडी, हरकुळ बुद्रुक कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, बीडवाडी हायस्कूल व आवार, कासार्डे धुमाळवाडी, हरकुळ खुर्द गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, बावशी येथील शेळीचीवाडी, पियाळी येथील गावठण. वैभववाडी तालुक्मयात भुईबावडा बौद्धवाडी, पहिलीवाडी, तळीवाडी, वेंगसर बंदरकरवाडी, तिरवडे तर्फ सौंदळ घागरेवाडी, कोळपे व मेहबूबनगर, ब्राह्मणदेववाडी, उंबर्डे, कोकिसरे पालकरवाडी. सावंतवाडी तालुक्मयात मळेवाड-माळकरवाडी येथील जि. प. शाळा नं. 2, कारिवडे गावठणवाडी, माडखोल बामणादेवीवाडी, निरवडे माळकरवाडी, बांदा गवळीटेंबवाडी, असनिये भटवाडी, धनगरवाडी, वायंगणवाडी, चौकुळ पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, सातोसे-दुर्गवाडी. कुडाळ तालुक्मयात उपवडे दातारवाडी, पणदूर मयेकरवाडी, आंब्रड वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, पडवे पहिलीवाडी, गावराई टेंबवाडी, रानबांबुळी पालकरवाडी, हिर्लोक खालची परबवाडी, साळगाव लुभाटवाडी. मालवण तालुक्मयात चिंदर देऊळवाडी, गावडेवाडी, शाळा गावठाणवाडी, बागवाडी, गोसावी मठ, हिवाळे, सुकळवाड राऊळवाडी व ठाकरवाडी. वेंगुर्ले तालुक्यात आसोली-फणसखोलवाडी, मातोंड. देवगड तालुक्मयात किंजवडे येथील आदर्श विद्यालय, शिरगाव धोपटेवाडी, नाद भोळेवाडी, नाडण मिराशीवाडी. दोडामार्ग तालुक्मयात कुंब्रल वरचा वाडा येथील जि. प. शाळा कुंब्रल नं. 1, कसई, वनविभाग विश्रामगृह परिसर.
जिल्हय़ातील सर्व धार्मिक कार्यक्रम व धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत. राज्य शासनाकडून पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 2670
अहवाल प्राप्त झालेले नमुने 2595
आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 130
निगेटिव्ह आलेले नमुने 2465
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 75
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 95
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 32
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 118
मंगळवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 5413
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 21775
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 357
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 19891
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 1527
2 मे 2020 रोजीपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 83846