केंद्राच्या अन्न पुरवठा विभागाचा निर्णय : आजपासून अंमलबजावणीचा आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
पॅकिंग केलेल्या प्रत्येक खाद्यपदार्थावर त्याची एक्स्पायरी डेट म्हणजेच कालबाहय़ दिनांक नमूद केलेली असते. या तारखेनंतर पदार्थाचे सेवन केल्यास तो आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. पण मिठाई दुकानात म्हणजेच स्वीटमार्टमध्ये मिठाईवर अशा कोणत्याही तारखेचा उल्लेख नसतो. असे कालबाहय़ पदार्थ सेवनानंतर अनेकांना विषबाधा होण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या अन्न पुरवठा विभागाने मिठाईवर एक्स्पायरी डेट असणे बंधनकारक केले आहे. मिठाईच्या दुकानात टेमध्ये विनापॅकिंग ठेवण्यात येणारी खुली मिठाई, दुधापासून बनविलेले पदार्थ यांच्या टेसमोर एक्स्पायरी डेट लावणे आवश्यक आहे.