दोडामार्ग – वार्ताहर-
कोनाळकट्टा येथे ठाकर समाजाच्यावतीने नुकताच आदिवासी दिन साजरा करण्यात आला. जिल्हा ठाकर समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्यावतीने या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पद्मश्री परशुराम गंगावणे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी समाजातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
दहावीतील हर्षदा आत्माराम ठाकर व बारावीतील श्रुती संतोष ठाकूर यांना पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज अध्यक्ष भगवान रणसिंग, सचिव दिलीप म्हस्के, उपाध्यक्ष रामा ठाकूर, कार्याध्यक्ष निलेश ठाकूर, यांसह दादा म्हस्के, अरुण रणसिंग, उज्वला रणसिंग, उमेश ठाकूर, प्रवीण ठाकूर, सरपंच पराशर सावंत, उपसरपंच प्रीतम पोकळे आदी उपस्थित होते.