प्रतिनिधी /पणजी
यंदाच्या निवडणुका लढवण्याच्या तयारीत असलेल्या आम आदमी पक्षाने शुक्रवारी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली.
दिल्लीचे आमदार आणि आम आदमी पार्टीचे गोवा डेस्क प्रभारी आतिशी यांनी ट्विट केले, की गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करताना आनंद होत आहे, सर्व उमेदवारांचे अभिनंदन. गोवा तुम्हा सर्वांकडे मोठय़ा आशेने पाहत आहे.” पक्षाने जाहीर केलेले तीन उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत.