म्हापसा /प्रतिनिधी
आम आदमी पक्षाचे नेते आणि “गोवन्स अगेन्स्ट कोरोना” या मोहिमेचे प्रमुख राहुल म्हांबरे यांनी म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिराला भेट दिली. देवळातील प्रमुख पुजाऱयांची प्राणवायू तपासणी (ऑक्सजिन लेव्हल चेकअप ) म्हांबरे यांनी यावेळी केली आणि त्यांचे व देव बोडगेश्वराचे आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी बोलताना राहुल म्हांबरे म्हणाले, “आम्ही येथे आमच्या कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी देव बोडगेश्वराचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. संपूर्ण गोव्यात कोरोनाविरुद्ध लढणाऱया आमच्या सर्व ऑक्सािमित्रांना देव बोडगेश्वराचा आशीर्वाद असणार असून या मोहिमेमध्ये तोच आमच्यासाठी एक अध्यात्मकि शक्ती असणार आहे”. या कोविडविरुद्धच्या लढय़ामध्ये आम्ही आमच्या बाजूने शक्मय तेवढे प्रयत्न करणार असून बाकी सर्व देवावर सोडणार असल्याचे म्हांबरे यांनी यावेळी सांगितले.
श्री बोडगेश्वर हा म्हापसा आणि उत्तर गोव्यातील लोकांचा राखणदार आहे. आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो तसेच सर्व गोमंतकीयांना त्याच्याविषयी श्रद्धा असल्याने त्यांच्या प्रार्थना तो ऐकेल असा विश्वास सर्व गोवेकरांना आहे.
देवळातील पुजाऱयांबरोबर उपस्थित नागरिकांच्या प्राणवायू स्तराची चाचणीही यावेळी करण्यात आली.
म्हांबरे यांच्याबरोबर सुनील सिग्नापुरकर आणि श्रीपाद पेडणेकर हेही उपस्थित होते.