शिक्षिका, मदतनीस व महिला कंडक्टर जखमी
प्रतिनिधी /फोंडा
फोंडय़ाहून सावईवेरे जाणार्या कदंबा बसला आपेव्हाळ येथे झालेल्या अपघातात बस कंडक्टरसह तिघेजण जखमी झाले. काल सोमवारी सकाळी 8 वा. सुमारास हा अपघात घडला. जखमीमध्ये बस कंडक्टर सुषमा गावडे (45, खांडोळा), नेगन सावंत (52, केपे), धनश्री नाईक (30, आडपई) यांचा समावेश आहेत.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कदंब बस जीए 03 एक्स 0388 फोंडय़ाहून सावईवेरे येथे जात होती. आपेव्हाळ-केरी जंक्शनजवळ कदंब चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने हा अपघात घडला. कदंबने प्रथम धडक वीजेच्या खांबाला दिल्यानंतर दगडी कुपणाला धडक देत गटारात जाऊन स्थिरावली. यावेळी कदंबचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघात नेमका कसा घडला याबाबत कोणालाच माहिती नाहि. गुरे रस्त्यावर आडवी आल्याने वाहनावरील ताबा गेल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतो. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. जखमाRना फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र धनश्री नाईक हिला बांबोळी येथे हलविण्यात आले. जखमीपैकी धनश्री हि शिक्षीका असून नेगन सावंत हि मदतनीस तर सुषमा हि बस तिकीट कंडक्टर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी हवालदार रघुनाथ गावस अधिक तपास करीत आहे.
सावईवेरे वळवई मार्गावरून कदंबा बस दिवसातtन चार फेर्या मारते. अपघातापुर्वी कदंबा प्रवाशासह पहली फेरी सावईवेरेहून फोंडयाकडे घेऊन आली होती. यावेळी प्रवाशी बसमध्ये बरेच प्रवाशी होते. फोंडयाहून सावईवेरे परतीच्या फेरीत मात्र रोजचे नेमकेच प्रवाशी घेऊन जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने जिवीतहानी टळली असली तरी चालक, क्लिनरसह, सर्व प्रवाशी किरकोळ जखमी झालेले आहे. काहाRनी इस्पितळात जाण्याचे टाळल्यामुळे नेमका आकडाहि कळू शकलेला नाहि.