ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा सध्या राजकीय केंद्र बनले आहे आणि सर्व राजकीय पक्षाचे नेते हाथरस येथे जावून पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करीत आहेत. त्यातच काही असे सुद्धा गैर जिम्मेदार लोकं आहेत जे कोरोना पॉझिटिव्ह असून सुद्धा हाथरस येथे गेले आहेत. या अशा लोकांमध्ये आम आदमी पार्टीचे दिल्लीतील आमदार कुलदीप कुमार यांचा देखील समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे, असे असून देखील ते हाथरस येथे गेले होते. याच पार्श्वभूमीवर हाथरस पोलिसांनी त्यांच्यावर महामारी ॲक्ट च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कुलदीप कुमार यांनी 29 सप्टेंबर रोजी आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली होती. आणि त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी हाथरस येथे जावून आल्याचा व्हिडिओ शेअर केला होता.
ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी कुलदीप कुमार यांच्यावर कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे.