हापूस उत्पादक मुकुंद जोशी यांनी घेतला आक्षे
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आफ्रिकेमध्ये तयार होणारा मालावी आंबा पुण्याच्या बाजार समितीमध्ये हापूस आंबा म्हणून खुलेआम विकायला सुरुवात झाली आहे. सुमारे 700 ते 800 रुपये प्रती किलो दराने हा आंबा हापूस म्हणून खपवला जात असल्याने येथील कोकण हापूस उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे सदस्य मुकुंद जोशी यांनी हा आंबा हापूस नावाने विकू शकत नसल्याबद्दल पुण्यातील आंबा विक्रेत्यांकडे आक्षेप नोंदवला आहे. कोकणातील हापूसला भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र मिळाल्याने अन्य प्रदेशातील आंबा हापूस या नावाने कोणीही विकू शकत नाह़ी
जिल्हय़ातील हापूस मातृवृक्ष असलेले सुमारे 80 हजार रोपे आफ्रिकेतील मालावी येथे एका युरोपियन कंपनीने नेली व तेथे या वृक्षांचे संवर्धन केल़े कोकणाप्रमाणेच मालावीतील वातावरण हापूस आंब्याच्या लागवडीसाठी पोषक असल्यामुळे येथे या मालावी आंब्याचे उत्पादन होऊन नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान विक्रीसाठी भारतामध्ये आयात होऊ लागले आहेत़ मात्र विक्री करताना विक्रेते हे मालावी आंबे हापूस म्हणून विक्री करु लागले होत़े मुळात हापूस आंब्याला जीआय मानांकन असल्यामुळे मालावी हापूस म्हणून विक्री करण्याकरता परवानगी नाह़ी
काही वृत्तवाहिन्यांनी याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध करताच आंबा उत्पादक संघ व इतर संस्थानी याबद्दल आक्षेप नोंदवत पत्रव्यवहार केला आह़े यावर पुणे बाजार समितीमधील विक्रेत्यांना याबद्दल समज देण्यात आली. या विक्रेत्यांनी मालावी आंबा हा मालावी हापूस म्हणून विक्री न करण्याचे मान्य केले आह़े
हापूसला जीआय मानांकन असल्यामुळे इतर कोणताही आंबा हापूस म्हणून विक्री करता येऊ शकत नाह़ी पुणे येथील व्यापाऱयांना याबद्दल पत्र व्यवहार करण्यात आला आह़े यापुढे मालावी हापूस म्हणून मालावी आंबाची विक्री न करण्याचे व्यापाऱयांनी मान्य केले आह़े
कोकणातील हापूसला भौगोलिक निर्देशन
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिह्यातील आंब्याला हापूस या नावाने बौद्धिक संपदा कायदा 1999 अन्वये भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र मिळाले आह़े ड़ॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्थाना हे प्रमाणपत्र मिळाले आह़े कोकणातील पाच जिह्यामध्ये उत्पादित होणाऱया आंब्याला हापूस या नावाने भौगोलिक निर्देशन मिळाल्याने कोकणाव्यतिरिक्त इतर प्रांतामधील आंब्याला हापूस या नावाने यापुढे संबोधता येणार नाह़ी