प्रतिनिधी/ बेळगाव
हळ्ळूर (ता. गोकाक) येथील सर्व्हे क्रमांक 371 मध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही जमीन एससी समाजाच्या कुटुंबीयांना मिळाली असताना इतर काही जण ही आपली जमीन आहे म्हणून कब्जात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी संबंधितांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी हळ्ळूर येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काही वर्षांपूर्वी एससी समाजाला 371 सर्व्हे क्रमांकमधील 3 एकर जमीन देण्यात आली होती. ही जमीन एनए करून त्या ठिकाणी आम्ही घरे बांधली आहेत. असे असताना या जमिनीमध्ये काही जण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेंव्हा या प्रकरणाची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी हळ्ळूर येथील नागरिकांनी केली. यावेळी भीमाप्पा दासर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.