बेळगाव /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी सोमवारी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या कार्यलयास भेट दिली. संचालक गजाननराव धामणेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव, लोकमान्यचे सीईओ अभिजित दीक्षित, पीआरओ केशकामत आणि व्यवस्थापक नागेश नलवडे आदी उपस्थित होते.