वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) दिलेल्या माहितीनुसार कंपनी आयएमजी-आर लिमिटेडमधील 50 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये याअगोदर करार करण्यात आला आहे. हा व्यवहार 52.08 कोटी रुपयांच्या रोख व्यवहारात पूर्ण होणार असल्याची माहिती रिलायन्सने शुक्रवारी दिली आहे.
आयएमजीची पूर्ण मालकीची सहकारी आयएमजी सिंगापूर पीटीइ लिमिटेडच्या आयएमजी-आरमधील 50 टक्के हिस्सेदारीची आहे. परंतु सदर व्यवहारानंतर आयएमजी-आर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची होणार आहे.
2010 मध्ये झालेला करार
आरआयएल आणि इंटरनॅशनल स्पोर्ट्स ऍण्ड मॅनेजमेंट कंपनी आयएमजीचा 2010 मध्ये करार केला आहे. दोन्ही कंपन्यांनी भारतामध्ये संयुक्त उपक्रमामार्फत कार्य केले आहे.
30 देशांमध्ये होणार व्यवहार
कंपनीचा व्यवसाय हा जवळपास 30 देशांमध्ये विस्तारला असल्याची माहिती आहे.