वार्ताहर / कुंभोज
बाहुबली [ हातकणंगले ] येथे इचलकरंजी आयजीएम रुग्णालयातील गेल्या बारा दिवसापूर्वी क्वारंटाईन केलेल्या डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांना आज त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तब्बल बारा दिवसानंतर बाहुबली येथून ग्रामपंचायत कुंभोज तलाठी कार्यालय कुंभोज आरोग्य विभाग कुंभोज बाहुबली विद्यापीठ यांच्यावतीने पुष्पवृष्टी करून मोठ्या सन्मानाने त्यांना निरोप देण्यात आला.
परिणामी गेल्या बारा दिवसापूर्वी इंचलकरंजी येथे कोरोनोचे काही रुग्ण आढळले होते. परिणामी त्यांच्या सेवेत असणाऱ्या काही डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना बाहुबली येथे बारा दिवसासाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. गेल्या बारा दिवसाची सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांची राहण्याची खाण्याची सोय बाहुबली विद्यापीठ बाहुबली, ग्रामपंचायत कुंभोज व जगवल्लभ पार्श्वनाथ चारीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने बाहुबली येथे करण्यात आली होती. परिणामी त्यांना बारा दिवस पूर्ण झाल्याने शासकीय यंत्रणेने दिलेल्या आदेशानुसार त्यांना बाहुबली येथून अनेक नागरिकांच्या उपस्थितीत संचारबंदी चे पालन करत निरोप देण्यात आला.
यावेळी त्यांनी गेल्या बारा दिवसात बाहुबली विद्यापीठ ग्रामपंचायत कुंभोज यांच्यावतीने चांगल्या पद्धतीची वागणूक मिळाली त्यांनी आम्हाला दिलेल्या सेवेचा आम्ही सतत ऋणी राहू, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांचा सत्कार ग्रामपंचायत कुंभोज तलाठी कार्यालय कुंभोज, बाहुबली विद्यापीठ यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी बोलताना गाव कामगार तलाठी संभाजी घाटगे म्हणाले की देशभर करोनो रोगाने थैमान घातले असताना त्याच्यावर उपाय योजनेसाठी आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा ग्रामपंचायत कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचे कार्य उल्लेखनीय असून. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आज मोठ्या प्रमाणात आपण कोरोनाला रोकु शकत आहोत.
परिणामी तो पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी नागरिकांनी संचारबंदी चे पूर्णपणे पालन करावे यावेळी कुंभोज आरोग्य अधिकारी डॉक्टर स्नेहा पाटील, बाहुबली विद्यापीठ प्राचार्य गोमटेश बेडगे कुंभोज ग्रामपंचायत सरपंच माधवी माळी, नंदकुमार माळी ,उपसरपंच सुकुमार पाटील, बंटी कांबळे शांतिनाथ धरणगुत्ती, हनुमंत मिसाळ, दगडू कांबळे सुरेश घोरपडे, उदय पवार तसेच ग्रामपंचायत आरोग्य विभाग व तलाठी कार्यालयातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद शिंगे कुंभोज